गंगाखेड येथे पुन्हा संचारबंदी
परभणी(प्रतिनिधी):- गंगाखेड येथे वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघुन ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुंगलीकर यांनी २६ जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
गंगाखेड शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाने २१ जुलै सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २६ जुलै मध्यरात्री १२ वा पर्यंत ही संचारबंदी लागूकरण्याचे आदेश दिले आहेत. ही संचारबंदी शहर नगरपालिका व लगतच्या ३ कमी च्या परिसरात राहणार आहे याबाबतचे इतर नियम व शर्थी नेहमीप्रमाणेच लागू करण्यात आले आहेत.
कालच जिल्ह्यातील संचारबंदीचे आदेश शिथिल करण्याचे आले मात्र नागरिकांना अजूनही सोशल डीस्टेनसींग पाळण्याचे भान आले नाही आणि त्यामुळे हा संसर्ग जर असाच वाढत राहिला तर पुन्हा संचारबंदी लागू करण्याचे आदेश नाकारता येत नाही.