गोंडखेडा येथिल गोविंद विश्वनाथ गुट्टे या शेतक-याने किटकनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या

0 132

किनवट,प्रतिनिधी—  गोंडखेडा (कोपरा) येथिल गोविंद विश्वनाथ गुट्टे या शेतक-याने किटकनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या केली. बँकेच्या कर्जासह सततची नापीकी आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्याने धोका दिल्याच्या मुद्यावरुन आत्महत्याकेल्याचे वृत्त आहे. महसूल आणि कृषी विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन बोगस बियाणे प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोपरा ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील गोंडखेडा येथिल गोविंद विश्वनाथ गुट्टे (वय वर्ष ४७) या शेतक-याने १५ जुलै २०२० रोजी किटकनाशक औषध प्राशन केले होते. उपरार्थ त्यास उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद येथे पाठवण्यात आले होते. उपचार चालु असतांना आज सकाळी (१६ जुलै) त्याचा मृत्यू झाला. शेवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करुण पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लहान शेतकरी असून बँकेचे थकीत कर्ज आहे. दरवर्षीच नापीकीचा सामना करावा लागत होता. त्यात अधिकची भर म्हणून या खरीपाच्या पेरणीवेळी दुबार पेरणीचे संकट. बोगस बियाण्यामुळे गुट्टे हे पुरते हतबल झाल्याने शेवटी वैतागून विष प्राषण केले.

त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. या बोगस बियाणे प्रकरणी आणि थकबाकीदाराचे कर्जमाफ का झाले नाही ? या प्रकरणी महसूल व कृषी विभिगाने लक्ष वेधून कार्यवाही अरण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!