जिल्ह्यातील ऑटो व स्कूल बस चालक- मालक यांच्यावर होत असलेला अन्याय सरकारनी थांबवावा
‘मनसे’ वाहतूक सेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
हिंगणघाट ,प्रतिनिधी – ‘मनसे’ जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांचा मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व वा.सेना जिल्हा संघटक रमेश घंगारे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभान खंडाईत यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात जिल्यातील ऑटो / स्कूल बस, व्हॅन चालकांना सरकार तर्फे मदत व अनुदान मिळावी.
सध्या जगात कोरोना या विषाणू व्हायरस ने थैमान घातले आहे संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झालेले आहे सर्व व्यवहार ठप्प पडले आहे अशातच ऑटो व स्कूल व्हॅन चालकांचा सुद्धा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सतत ४ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे सर्व ऑटो व स्कूल व्हॅन चालक घरी असल्याने व घरातील इतर सदस्य म्हातारे आई-वडील असल्याने त्यांचा औषध पाण्याचा खर्च सुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांचा परिवारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊन मुळे ऑटो व स्कूल व्हॅन चालक अडचणीत सापडला आहे. आणखी किती दिवस आवक थांबल्याने त्यांना जिवनावशक्य वस्तू, किराणा, तेल, धान्य,औषधी,इलेक्ट्रिक बिल, तसेच मुलांचा खर्च, शाळेतील फि अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. दोन वेळचे अन्न कसे गिळता येईल असा दररोज प्रश्न त्यांना भेडसावतो असतो.
अशा परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने लक्ष देऊन ऑटो व स्कूल व्हॅन (बस) चालक व त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी खालील मागण्यांची पूर्तता करून ऑटो व स्कूल चालक मालक कुटुंबांला न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेने केली.
१. स्कूल बस चालक व मालकांना मासिक १०००० रु.प्रति माह इतकी मदत करावी.
२. मोटार टॅक्स व घर टॅक्स मध्ये सूट द्यावी.
३. गाडी पासिंग करीता लागणाऱ्या विविध खर्चात कपात करावी.
४. स्कूल बस चालकांच्या पाल्यानां शिक्षणामध्ये स्कॉलरशीप उपलब्ध करून द्यावी.
यावेळी मनसे वा. सेना जिल्हा संघटक रमेश घंगारे, वा.सेना ता. संघटक जितेंद्र रघाटाटे, हेमंत घोडे, जयपाल पाटील, सिद्धार्थ वासेकर, मंगेश हुलके, रवींद्र खोकले, अरविंद भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});