टिटवाळा येथे रक्तदान शिबिर संपन्न
टिटवाळा,दि 13 (प्रतिनिधीः सध्या देशभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे, ह्या गोष्टीचा विचार करून रक्ताची गरज भागवता यावी या उद्देशाने टिटवाळा येथे सोशियल डिस्टन्स चे पालन करत टिटवाळा महोत्सव समिती, अभिषेक रेसिडेन्सी व मानवता हाच धर्म समूहाच्या संयुक्त सहकार्याने पल्लवी रक्तपेढी च्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. कोरीनो सदृश परिस्थिती असताना देखील २८ रक्तदात्यांनी ह्या शिबिरास भेट देऊन रक्तदान करून हे शिबीर यशस्वी केले. ह्या शिबीर आयोजित करण्याकरिता टिटवाळा महोत्सव समिती चे आयोजक विजयभाऊ देशेकर, अभिषेक रेसिडेन्सी चे खजिनदार प्रासद फर्डे सर, मानवता हाच धर्म च्या दीपाली सुर्वे मॅडम, निलेश बच्छाव सर,जयेंद्र फर्डे,मनीष पाचघरे टिटवाळा महोत्सव समिती चे सदस्य गणेश वागजे, निलेश जाधव,आकाश चौधरी व अभिषेक रेसिडेन्सी चे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिर यशस्वी केल्याबाबत पल्लवी रक्तपेढी कडून सर्वांचे आभार मानले.