डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह घरावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध; समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी―प्रा.टी. पी.मुंडे

0 143

परळी,प्रतिनिधी- मुंबईतील दादर येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या घरावर काही अज्ञात समाजकंटकांनी भ्याड हल्ला करून घरातील सामानाची तोडफोड केली. कुंड्यांची तोडफोड केली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी केली आहे.

मुंबई येथील दादर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी राजगृह हे आपले घर बांधले होते . अनेक जागतिक पर्यटक या स्थळाला भेट देतात ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे हे ठिकाण आहे यात घरावर काल संध्याकाळी अज्ञात समाजकंटकांनी भ्याड हल्ला करून घरातील सामानाची तोडफोड केली हा हल्ला म्हणजे आंबेडकरी जनतेच्या विचाराच्या अस्मितेवर हल्ला आहे आणि एवढेच नव्हे तर हा हल्ला आमच्या अस्मितेवर हल्ला आहे. आंबेडकरी विचाराची जनता असे हल्ले सहन करणार नाही असे मत लोकनेते प्रा.टी. पी .मुंडे सर यांनी व्यक्त केले.

तसेच या घटनेमागील समाजकंटकांचा पोलीस यंत्रणेने शोध घेऊन भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून शिक्षा करावी अन्यथा आंबेडकरी विचाराची जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान झालेला प्रकार हा निंदनीय आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही हल्लेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे आंबेडकरी विचाराच्या जनतेने संयम व शांतता राखावी असे आवाहन लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांनी आंबेडकरी विचाराच्या जनतेला मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.

तीन वर्षांनंतरही मिळेनात फायदे ; विधवा स्त्रियांचे हेलपाटे निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार

 

error: Content is protected !!