नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी अभियंता एसिबिच्या जाळ्यात
मनमाड, सतिश परदेशी – उप-विभागीय अधिकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग नंदूरबार राहणार नवापूर (वर्ग 1) यांना लाललुचपत
प्रतीबंधक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी तक्रारदारदार यांच्या तक्रारीवरून मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडून गुन्हे दाखल केले.
यातील मूळ तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून जिल्हा परिषद नंदूरबार अंतर्गत मौजे पिंपरी पाडा येथे रस्त्यादुरुस्ती चे काम व नंदूरबार पंचायत समितीच्या दुरुस्तीचे कामे इत्यादी शासकीय कामाचे ठेके घेऊन पूर्ण केली आहेत सर्व कामाचे एकूण बिल 44 लाख त्यांना मिळाले आहेत.
सदर 44 लाखाच्या कामाच्या मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या कडे 2.5 टक्के लाच मागितली व त्याप्रमाणे हिशोब करून 1 लाख 5 हजाराची लाच नक्की करून मागणी केली पैकी 20000 हजार रुपये 2 दिवसांपूर्वी घेतले उर्वरित 85 हजार रुपये पंच व साक्षीदार यांच्या समक्ष पंचायत समिती नंदूरबार येथे आरोपी लोकसेवक यांच्या कार्यालयात लाच स्वीकारताना पकडले व गुन्हा दाखल करण्यात आला.
1) मा श्री सुनिल कडासने सो, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
2) मा निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरिष जाधव
पोलीस उप अधिक्षक,
ला. प्र. वि. नंदूरबार युनिट
जयपाल अहिररराव
पोलीस निरीक्षक ला प्र वि नंदूरबार यांनी मिळालेल्या तक्रारीवरून सापळा रचुन
HC/ उत्तम महाजन
संजय गुमाणे, मनोहर बोरसे
PN, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे अमोल मराठे
,WPN ज्योती पाटील ईत्यादीच्या सहाय्याने उप-विभागीय अधिकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग नंदूरबार यांना लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली व गुन्हे दाखल करण्यात आले तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन
नागरीकांना आवाहन करण्यात आले की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ
अँन्टी करप्शन ब्युरो,नंदूरबार
*@ दुरध्वनी क्रं.02564- 230009
@ टोल फ्रि क्रं. 1064
मोबाइल नंबर 9594401777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले.
संत तुकाराम महाराज यांचे प्रस्थान सोहळा मर्यादित वारकर्यांच्या उपस्थित संपन्न