नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सन 2020-21 मधील अनधिकृत शाळांची यादी
नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 20 मार्च, 2020 अखेर खालील प्राथमिक शाळा शासनाची/नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.
तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या म.न.पा. किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत.
ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासन मान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. असे नवी मुंबई महानगरपालिका चे शिक्षण अधीकारी यांनी सांगितले आहे.
बँक,बचतगट, मायक्रोफायन्स ,वीज बिल माफ करावे -आर पी आय ची मागणी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});