नागरिकांच्या मागणीनुसार स्वप्निल बागुल ह्यांनी आपल्या स्वखर्चानी सोसायटीत केली निर्जंतुक फवारणी

0 108

अंबरनाथ, जाफर वणू – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून समाजसेवक स्वप्निल बागुल ह्यांना संपर्क साधला असता वड़वली परिसरातील प्रत्येकी 1 दिवसात 2 ते 3 सोसायटीमध्ये जाऊन दररोज आपल्या स्वतःच्या खर्चानी सोसायटीत निर्जंतुक फवारणी करून देण्यात आली.

कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर रोगाने जगभरात नव्हे तर अंबरनाथ शहरात सुद्धा सुमारे 2 हजारापेक्षा जास्त पटिने वाढ झालेली आहे. तसेच अंबरनाथ पूर्व विभागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने .. नागरिक भयभीत झाले आहे. परंतु अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून या परिसरात निर्जंतुक फवारणी करणारी वाहने बिल्डिंगमध्ये फवारणी करीत नाही व आम्हाला दादही देत नसल्याचे अशा आरोप नागरिक करीत आहे.

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून परिसरातील नागरिकांनी समाजसेवक स्वप्निल बागुल ह्यांना मोबाईलद्वारा संपर्क साधुन त्यांची संपूर्ण बिल्डिंग परिसर आणि टेरेस ते जिने, दरवाजे खिडक्या संपूर्ण सोसायटी sanitization करून देण्याची मागणी केली असता समाजसेवक स्वप्निल बागुल ह्यांनी परिसरातील प्रत्येकी 1 दिवसात 3 सोसायटीमध्ये स्वतः जाऊन दरोरोज निर्जंतुक फवारणी केली. तसेच sanitization दररोज सुरुच राहणार आहे. काही काही बिल्डिंगमध्ये sanitization चा 3 रा राउंड सुरु केला आहे. तसेच लॉकडाउन पासून विविध उपक्रम पार पडले आहे. परंतु कोरोनाचे संकट वाढतच असल्याने तिसरा टप्प्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सँनिटायझर बॉटल वाटप करण्यात आले.

याप्रसंगी राजकारण न करता जास्तीत जास्त समाजकारण करीत असतात. एवढे नव्हेतर समाजसेवेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच जनतेसाठी वारंवार सूचना आदेश निर्देश जनतेपर्यंत पोहचवून जनतेला वारंवार साबणाने हात धुणे, सानिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क अथवा रुमाल वापरणे सुरक्षित अंतर ठेवणे व सर्वसामान्य माणसाला कोरोनाची लागण होऊ नये म्हूणन स्वप्निल बागुल यांनी आपल्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता महामारी व संचारबंदी काळात बहुमूल्य वेळ देऊन दररोज काही ना काही सामाजिक कार्य करीत असतात. याबद्दल स्वप्निल बागुल यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!