नॅशनल इन्स्टिटयुशनल रॅकिंग फ्रेमवर्क या राष्ट्रीय मानांकन क्रमवारी देशात पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यलयाला तिसरे स्थान प्राप्त
नॅशनल इन्स्टिटयुशनल रॅकिंग फ्रेमवर्क ( NIRF Ranking 2020) या राष्ट्रीय मानांकन क्रमवारी देशात पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यलयाला (Dr. D. Y. Patil Dental Hospital)तिसरे स्थान प्राप्त झाले.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या वतीने गुरुवार 11 जून 2020 रोजी भारतीय शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठ यांचे एनआईआरएफ रैंकिंग 2020 नुसार मूल्यमापन (evaluation)करण्यात आले. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी घोषणा केली.
देशपातळीवर पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ अंतर्गत डॉ. डी. वाय पाटील दंत महाविद्यालयास 3 रे स्थान प्राप्त झाले ‘दंत महाविद्यालय श्रेणीत’ देशात तिसरे व महाराष्ट्रात प्रथम ठरले . पहिल्यांदाच दंत शाखेचा एन आई आर एफ श्रेणी मध्ये सामावेश करण्यात आला होता व ‘वैद्यकीय श्रेणीत” डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास 24 वे स्थान प्राप्त झाले .
तसेच डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फर्मास्युटिकल्स सायन्स अँड रिसर्च महाविद्यालयाला 41 वे स्थान प्राप्त झाले तर डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (Dr.D.Y. Patil Institute of Technology) महाविद्यालयास 196 वे स्थान प्राप्त झाले देशभरातील विद्यापीठ श्रेणीत डॉ डी वाय पाटील विद्यापीठ (DPU) पिंपरी, पुणे हे 46 वे क्रमांक प्राप्त झाला आहे. भारतातील एकूण 5000 हुन अधिक शैक्षणिक संस्थांचे एनआईआरएफ मार्फत मूल्यमापन करण्यात आले होते.
“दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा अधिक भर आहे. प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शिक्षणाप्रती घेतलेल्या या परिश्रमामुळे आज हे यश प्राप्त झाले. याचा आम्हाला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व आधुनिक युगात सक्षम करणे हाच हेतू आहे”. असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व्यक्त केले.
मिळालेल्या या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू डॉ एन. जे. पवार, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात लॅपटॉप, वेबकॅम, अँड्रॉइड मोबाइल मागणीत तिप्पट वाढ
रेल्वेतर्फे विशेष पार्सल गाड्यांमध्ये वाढ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});