लॉकडाऊनच्या काळात लॅपटॉप, वेबकॅम, अँड्रॉइड मोबाइल मागणीत तिप्पट वाढ

0 412

ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड?
माजलगांव, धनंजय माने – कोविड १९ करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांना पालक शाळेत पाठवण्यास धजावत नसल्याने अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या बाजारात लॅपटॉप, टॅब व अँड्रॉइड मोबाइल आदी ऑनलाईनशी संबंधित उपकरणाची मागणी वाढली यात मात्र पालकांना या वस्तू खरेदी कराव्या लागत असल्याने त्याना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून विकत नसलेले उपकरणांना बच्चा कंपनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीमूळे या वस्तूच्या विक्रीला आता अचानक उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत या वस्तूची मागणी अधिक झाली असल्याची व्यापाऱ्यांनी सांगितले.

लॉक डाऊन मुळे घरात अडकलेलापालकवर्ग फोन, लॅपटॉप, कम्प्युटर इंटरनेटच्या माध्यमातून वर्कफॉर होम करत आहे. त्यातच मुलांच्याही शाळा डिजिटल झाल्याने त्यांच्या अभ्यासासाठी पालकांचे मोबाइल गुंतून राहू लागले आहेत. शाळा नेमक्या कधी सुरू होणार आहेत हे शासनाकडून अद्याप सांगण्यात आले नाही. शासन ई शाळा (ऑनलाईन) सुरू करण्याच्या
मनस्थितीत आहे. या परिस्थितीवर तोडगा म्हणून अनेक पालकांनी सध्या मुलांसाठी त्यांना स्वतःचा अँड्रॉईड मोबाईल टॅब लॅपटॉप देने हा मार्ग मुलांच्या भविष्यासाठी स्वीकारत करत आहेत.

लॅपटॉपच्या तुलनेत टॅब परवडत आल्याने त्याचा विचार करतात. पूर्वीच्या विक्री पेक्षा २५ ते ३० टक्के अधिक विकले गेले असल्याचे शहातातील व्यापाऱ्यांनी सांगितले. तर ऑनलाइन बाजारपेठेतही या विक्रीसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. बंदीमुळे कारखाने, दुकाने बंद असल्याने ऑनलाईन शॉपिंगपण वाढली आहे. अजून बाजारात आवश्यक तेवढा माल आला नसल्याने पालकांनी दुकानदाराकडे नोंद करून ठेवली आहे.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे अजून काही दिवसात मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रब्बी पेरणीच्या तयारीत शेतकरी (पालक) आहेत. यात ह्या महागड्या उपकारणाची खरेदी करणे म्हणजे दुष्काळात तेरावा! बी बियांन घ्यायचे की या वस्तू अशी दुविधा परिस्थिती निर्माण झाली आहे आणि प्रत्येक महिन्याला नेट पॅक वेगळाच ? मग पैसा आणायचा कोठून ? हा प्रश्न सर्व पालकांना सध्या भेडसावत आहे. कधी एकदाची सुरळीतपणे शाळा सुरू होते. याकडे पालकांचे व विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे. यात मात्र मोबाईल कंपन्याची मात्र चांदी झाली आहे.

तब्लीग़ी जमात आणि मरकज़ – लियाकत शाह

संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्यास जास्तीत जास्त ५० लोकांना प्रवेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी का गुलाबी झाले ? वाचा लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होण्यामागे शास्त्रीय कारण



error: Content is protected !!