ब्रेकिंग – परभणीत संचारबंदी लागू; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात प्रशासनाने अतिशय योग्य नियोजन करून कोरोनाचा शिरकाव होण्यापासून रोखले होते. परंतु मागील काही दिवसांत बाहेर गावावरून येणार्या नागरिकांमुळे परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून दि. 26 मेच्या सकाळी 7.00 पासून ते दि. 28 मे रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू केले आहेत.
बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढू शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून परभणी महानगपालिक हद्द व त्या लगतचा 5 किमी परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्द व लगतचा 3 किमी परिसरात संचारबंदी आदेश लागू केले आहेत.
यांना मिळणार सवलत
या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
– दुध विक्रेते (केवळ सकाळी 6 ते 9. एका ठिकाणी थांबून दूध विक्रीस बंदी)
– खत वाहतूक, त्यांची गोदामे / दुकाने, त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार
– राष्ट्रीयीकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदार यांच्याकडून चलनाव्दारे पैसे भरणा करून घेणे या बाबीकरिता.
याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.
घरपोच आंबा विक्रीतून चार लाखांचे उत्पन्न; लोणगावच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 14 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 36