परभणी, प्रतिनिधी – परभणी (parbhani) जिल्ह्यातील 19 कोरोना (corona) बाधित रूग्णांना आज ठणठणीत झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली असून केवळ 37 कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होताना दिसत आहे.
परभणी जिल्ह्यात (parbhani district) एकूण 89 कोरोना बाधित रूग्ण आढळले होते. त्यापैकी आजपर्यंत दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 50 रूग्णांना बरे करून सुट्टी देण्यात आली आहे तर आता केवळ 37 रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी असून जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होताना दिसत आहे.
आज परभणी जिल्ह्यातील 19 कोरोना बाधित रूग्णांना बरे करून सुट्टी देण्यात आली आहे. त्यापैकी परभणी महानगरपालिका हद्दीतील मातोश्री नगरातील एक 35 वर्षीय महिला व एक 32 वर्षीय पुरूष, नागसेन नगरातील एक 30 वर्षीय महिला, त्रिमुर्ती नगरातील एक 23 वर्षीय महिला व एक 9 वर्षीय मुलगी, इटलापूर मोहल्यातील एक 32 व एक 34 वर्षीय पुरूष यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच परभणी तालुक्यातील कारेगाव येथील 35 व 38 वर्षीय दोन पुरूषांना सुट्टी देण्यात आली आहे. गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील 32, 33 व 38 वर्षीय तीन पुरूष व 10 वर्षीय एक मुलगी, माखणी येथील 13, 24 व 27 वर्षीय तीन पुरूष व 24 वर्षीय एका महिलेला कोरोना मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहेत. तसेच पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथील एका 28 वर्षीय पुरूषाला ठणठणीत करून सुट्टी देण्यात आली आहे.
आज शुक्रवार सायंकाळी 5.00 वाजेपर्यंतच्या अहवालानूसार परभणी जिल्ह्यात एकूण 2468 संशयितांपैकी 2635 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 2318 निगेटीव्ह, 89 पॉझिटीव्ह, 117 प्रलंबित तर 77 अनिर्णायक असून 34 जणांचे स्वॅब तपासणी आवश्यक नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच आज १८ जणांचे अहवाल नेगेटिव्ह आलेले आहेत.
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
TikTok च्या डाऊनलोड्समध्ये भारतात मागील दोन 2 महिन्यात 51% घसरण; व्यवसायाची वाट बिकट