तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
तबलिगी जमातचे २५५० परदेशी सदस्य काळ्या यादीत
ब्युरो रिपोर्ट – दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. या सर्वांवर १० वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याआधीदेखील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
एकूण आठ हजार लोक या तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकजण करोनाबाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले होते. जे लोक पर्यटक व्हिसावर आले होते व तरीही निझामुद्दीन येथील कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कारण त्यांनी व्हिसा अटींच्या निर्बंधांचे उल्लंघन केलं होतं.
ज्यांना काळ्या यादीत टाकले आहेत ते आता पुन्हा भारतात येऊ शकणार नाहीत. पोलिसांनी याआधी कारवाई करण्यात आल्यानंतर माहिती देताना एकूण २८१ परदेशी नागरिक हे निझामुद्दीन परिसरात दोन दिवस उपस्थित होते अशी माहिती दिली होती. त्यात नेपाळ १९, मलेशिया २०, अफगाणिस्तान १, म्यानमार ३३, अल्जेरिया १, दिजबौती १, किर्गिझस्तान २८, इंडोनेशिया ७२, थायलंड ७, श्रीलंका ७२, बांगलादेश १९, इंग्लंड ३, सिंगापूर १, फिजी ४, फ्रान्स १, कुवेत १ या प्रमाणे नागरिक उपस्थित होते. हे सर्व परदेशी लोक पर्यटक व्हिसावर आले व धार्मिक कार्यक्रमात सामील झाले होते.
व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून दिल्लीच्या निझामुद्दीन मर्कझ येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीरीत्या धर्मप्रचाराच्या उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्रे सादर केली आहेत.
IPL : आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून विविध पर्यायांवर विचार सुरु
मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार
अनलॉक 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील
TikTok च्या डाऊनलोड्समध्ये भारतात मागील दोन 2 महिन्यात 51% घसरण; व्यवसायाची वाट बिकट
मिशन बिगीन अगेनची नवी नियमावली जाहीर; या ठिकाणी दिली जिल्ह्यांतर्गत प्रवासाला परवानगी