मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

0 118

पुणे – कोरोनाच्या संकट काळात राज्यात दीड महिना सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद होत्या. मद्यविक्री देखील बंद होती. महिनाभरापूर्वी राज्य सरकारने मद्यविक्रीस परवानी दिली आणि दुकानासमोर लांब रांगा लागल्या. या महिनाभराच्या मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत ७७५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आणि त्यात एकट्या पुणे जिल्ह्याचा वाटा १०० कोटी रुपयांचा आहे.

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी परमिट रूम, बियर बार सुरू करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. परंतु या परमिट रूम आणि बियर बारमध्ये ग्राहकांना अन्न उपलब्ध करून देता येणार नाही किंवा या ठिकाणी बसता येणार नाही, अशी अट देखील घालण्यात आली आहे.

मद्यविक्री सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतकेच नव्हे तर टोकन पद्धतही सुरू केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक मजूर मूळगावी परतले आहेत. तसेच, सध्या बहुतांश उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या उत्पन्नातही घट झाली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला दर महिन्याला सुमारे २१०० कोटींचा महसूल मिळतो. या तुलनेत मे महिन्यातील महसूल कमी आहे. मे महिन्यात मद्यविक्रीतून ७७६ कोटी आणि लायसन्स शुल्कमधून २१३ कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कविभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली.

IPL : आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून विविध पर्यायांवर विचार सुरु

तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज : मोबाईलधारक एका दिवसात आता पाठवु शकतात ‘100’ पेक्षा जास्त मेसेज; ट्रायने घेतला मोठा निर्णय

अनलॉक 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील

TikTok च्या डाऊनलोड्समध्ये भारतात मागील दोन 2 महिन्यात 51% घसरण; व्यवसायाची वाट बिकट

मिशन बिगीन अगेनची नवी नियमावली जाहीर; या ठिकाणी दिली जिल्ह्यांतर्गत प्रवासाला परवानगी


error: Content is protected !!