मिशन बिगीन अगेनची नवी नियमावली जाहीर; या ठिकाणी दिली जिल्ह्यांतर्गत प्रवासाला परवानगी

0 224

मुंबई – राज्यात पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यात टप्याटप्याने आर्थिक व्यवहार सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारनं 3 जूनपासून लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात आता लॉकडाऊन नाही मिशन बिगीन अगेन सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीत मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये (चचठ) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

 

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूक बंदी केली होती. यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रातही कामानिमित्त प्रवास करणं शक्य नव्हतं. यामुळे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे आणि एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे.

 

3 जूनपासून मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यात सम- विषम या तत्वावर दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसर्‍या बाजुची दुकानं दुसर्‍या दिशी सुरू राहतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेकडून वेळ ठरवून दिली जाणार आहे.

 

याशिवाय आऊटडोर फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे घराबाहेर व्यायाम करायला गेलात तर तुम्हाला ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत.

 

खासगी ऑफिसमध्ये 10 टक्के कर्मचारी असतील. इतर कर्मचारी घरून काम करतील. ऑफिसमध्ये येणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात.

 

घरोघरी वृत्तपत्र वितरण करता येणार आहे, मात्र वृत्तपत्र दारोदारी पोहोचवणार्‍याने मास्क घालणं बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्सिंग नियमांचंही पालन करावं.

IPL : आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून विविध पर्यायांवर विचार सुरु

तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई

मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

अनलॉक 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील

TikTok च्या डाऊनलोड्समध्ये भारतात मागील दोन 2 महिन्यात 51% घसरण; व्यवसायाची वाट बिकट

ब्रेकिंग न्यूज : मोबाईलधारक एका दिवसात आता पाठवु शकतात ‘100’ पेक्षा जास्त मेसेज; ट्रायने घेतला मोठा निर्णय


error: Content is protected !!