परळीची धाकधुक वाढली! काल पाठवलेल्या 50 पैकी 1 पॉझीटीव्ह
आज पुन्हा नवीन 38 स्वॕब
परळी, प्रतिनिधी – काल परळी शहरातील स्टेट बॕक आॕफ इंडियाच्या पाच कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने त्यांच्या संपर्कात आलेले व इतर व्यक्ती असे एकुण 50 स्वॕब परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाने घेतले होते.त्या 50 व्यक्तीचा तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन 50 पैकी 1 जनांचा अहवाल कोरोना पाॕझिटिव्ह आला आहे.आज पुन्हा नव्याने 38 संशयीत व्यक्तींचे स्वॕब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती डॉ लक्ष्मण मोरे यांनी दिली.
परळी तालुक्यातील कोरोना बाधिंतांच्या आकडा आता एकुण 9 झाला आहे. यापैकी 6 व्यक्ती कोरोनावर उपचार घेत आहेत तर 3 जणांनी यापुर्वीच कोरोनावर मात केली आहे.
परळीकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काळजी घेतली गेली पाहिजे.
उपजिल्हा रुग्णालय परळी वै.
दि.05/07/2020
आज घेतलेले स्वॕब….38
काल पाठवलेले सॕब….50
निगेटिव्ह……49
पाॕझिटिव्ह….01
प्रलंबित……00
आज पर्यत पाठवलेले एकुण स्वॕब 308
निगेटिव्ह ….299
पाॕझिटिव्ह ….09 (कोरोना अक्टीव-6, कोरोना मुक्त-3)
प्रलंबित …… 00
परभणी जिल्ह्यात जिंतूर व सोनपेठ वगळता नागरी भागासह लगतच्या परिसरात संचारबंदीत वाढ
माऊलींचा पालखी सोहळ्यातील गोपाळ काला प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न