परळीत पोलिस,नप. व महसुल प्रशासन सतर्क; पोलिसांची गस्त तर प्रशासनाकडुन आवाहन
परळी वै ,प्रतिनिधी – परळी एसबीआयतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पाझिटिव्ह आढळुन आल्याने आज परळीत पोलिस,नप. व महसुल प्रशासन सतर्क होऊन संभाजी नगर व शहर पोलिसांची गस्त तर प्रशासनाकडुन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
12 जुलैच्या मध्यराञी पर्यत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संपुर्ण शहरात संचारबंदीची घोषणा केली आहे.परंतु काही नागरिक रस्त्यावर विनाकारण वावरताना दिसुन येत आहेत शिवाय तोंडाला मास्क न लावने,मोटार सायकली इकडुन तिकडे फिरवने अश्या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने परळीत प्रशासन आता थेट रस्त्यावर उतरले असुन अधिक सतर्क झाले आहे.महसुल प्रशासनाने स्वतःच्या गाडीच्या स्पिकर मधुन जनतेला घरा बाहेर पडु नका असे जनतेला आवाहन केले आहे.
तर नगर परिषदेच्या वतिने ही गल्ली बोळात जाऊन मास्क वापरा घरात बसा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले तर संभाजी नगर,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी सकाळ पासुन शहरात गस्त सुरु केली आहे.प्रत्येक नागरीक,प्रत्येक वाहनाची चौकशी सुरु केल्याने माञ दुपार नंतर शहर चक्क निरमनुष्य झालेले दिसले आहे. याकामी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक,तहसीलदार डॉ विपीन पाटिल,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे,कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे व संभाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम व इतर पोलिस अधिकारी कर्मचारी सहभागी होते.
तीन वर्षांनंतरही मिळेनात फायदे ; विधवा स्त्रियांचे हेलपाटे निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});