परळी शहरामध्ये संचारबंदी आदेश 14 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत कायम
बीड – परळी शहरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण संख्ये मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून फार मोठया संख्येने प्रयोग शाळेतील अहवाल तपासून येणे बाकी असल्यामूळे 14 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वा पर्यंत परळी शहर बंद ठेवण्यात आले असून याबाबत संचारबंदी कायम करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
यापूर्वी परळी शहरातून इतर भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार परळी शहरात 08 दिवसांसाठी ( 12 जूर्ले रोजी 12.00वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषीत करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सदर आदेश पुढील दोन दिवसांसाठी म्हणजेच दिनांक 14 जुलै 2020 रोजीचे रात्री 12.00 वा पर्यंत कायम करण्यात आले आहेत.
परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सदर बँकेमध्ये परळी शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी मोठया प्रमाणत ये-जा झाली असून प्रतिंबधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.
जिल्ह्यात दिनांक ३१ जूर्ले २०२० रोजीचे रात्री 12.00वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.
सोळंके कारखान्याने थकविले पैसे, कारवाई करण्याची साखर आयुक्तांकडे मागणी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});