पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे: सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 24 हजार 548 क्विंटल अन्नधान्याची तर 22 हजार 607 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 6 हजार 451 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 36 हजार 547 क्विंटल इतकी झाली आहे.
पुणे विभागात 11 जून 2020 रोजी 96.196 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.006 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात लॅपटॉप, वेबकॅम, अँड्रॉइड मोबाइल मागणीत तिप्पट वाढ
रेल्वेतर्फे विशेष पार्सल गाड्यांमध्ये वाढ
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});