पुन्हा वानरांच्या हल्यात तिघे जखमी

0 366

पाथरी, प्रतिनिधी – तीन जनांवर वानराने अचानक हल्ला करुन चावा घेतल्याने या हल्ल्यात लहान मुलासह शेतकरी जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाचा पुन्हा वानराने तिन माहिलांवर हल्ला करून त्यांचा चावा घेत गंभीररीत्या जख्मी केल्याची दुसरी घटना तालूक्यातील झरी येथे बुधवार १० जुन रोजी घडली जखमींवर मानवत ग्रामीण रूग्नालयात उपचार करण्यात आले.

 

तालूक्यातील झरी गाव शिवारात मागील महीन्याभरापासुन वानरांच्या टोळक्याचा उपद्रव मोठया प्रमाणात वाढला आहे. घरावरील पत्रावर उडया मारून घरांचे व शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत आहेत. उपद्रव करीत असतांना आता हे वानंराच टोळक मानसांवरही ह्ल्ले करीत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ वानरांच्या टोळक्याच्या दहशतीने भयभीत झाले आहेत. यापुर्वी गावातीन तीन जनांवर या वानरांच्या टोळक्याने हल्ला केला होता. त्यामुळे वानराच्या दहशतीखाली असणाऱ्या ग्रामस्थांनी फोन करून सदरील घटना वन विभागाच्या कानावर घातली असतांना यावर कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने या घटनेस २० ते २५ दिवसाचा कालावधी झाला असतांनाच पुन्हा या वानराच्या टोळक्याने मानसांवर हल्ले करण्यास सुुरूवात केली असुन दोन दिवसात तीन महीलावर हल्ले करून त्यांना गंभीररीत्या जख्यी केले आहे.

 

मंगळवार ९ जुन रोजी ६२ वर्षीय सुंदराबाई सत्वधर व ४८ वर्षीय शकुंतलाबाई सत्वधर या घरातील अंगनात घरकाम करत असतांना यांच्यावर वानरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. तोच दुसऱ्या दिवशी बुधवार १० जुन रोजी सकाळी ३२ वर्षीय संजीवनी बनगर या घरात काम करीत असतांना त्यांच्यावरही वानरांने ह्ल्ला करून त्यांच्या पाठीचा चावा घेऊन त्यांना गंभीररीत्या जखमी केले आहे. या तीनही महीलांवर मानवत ग्रामीण रूग्नालयात उपचार करण्यात येत आहेत. महिण्याभरात एकूण सहा जनावर वानराच्या टोळक्याने हल्ला केल्यामुळे ग्रामस्थ गावात वानरांच्या टोळक्याच्या दहशतीचे वावरत असुन गावात भितीचे वातावरण पसरले आहे.एकीकडे कोरोनाच्या संकटाने भयभीत झालेल्या नागरीका समोरे वानराचे नवीनच संकट उभे राहीले आहे.या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी तहसीलदार व वनविभागाकडे केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी का गुलाबी झाले ? वाचा लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होण्यामागे शास्त्रीय कारण

विद्यार्थ्यांचे आनंदाने शिक्षण व्हावे, आपत्कालिन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहीले पाहिजे – मुख्यमंत्री

 



error: Content is protected !!