प्रा.गंगाधर बालन्ना उषमवार यांना पीएच.डी प्रदान
माजलगांव, प्रतिनिधी :- श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, हिंदी विषयाचे प्रा. गंगाधर बालन्ना उषमवार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिनांक १७/०७/ २०२० रोजी संपन्न झालेल्या ऑनलाइन मौखिक परिक्षेनंतर हिंदी विषयातील विद्यावाचस्पती पीएच.डी ही प्रदान केली.त्यांनी देवकीनंदन शुक्ल के कथा साहित्य में यथार्थ बोध या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शैलजा वाडीकर,कोल्हापुर येथील प्रा.डाॅ.अर्जुन चव्हाण, मार्गदर्शक प्रा.डाॅ. एस.एल.मुनेश्वर यांच्या संघाने संशोधन कार्य पाहून पीएच.डी प्रदान केली.
या यशा बद्दल भा. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलुरकर, उपाध्यक्ष राधेश्यामजी लोहिया,कार्यवाह नितीनजी शेट्टे, सहकार्यवाह प्रा.चंद्रकांतजी मुळे, डाॅ.हेमंतजी वैद्य, केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे पालक सुनीलजी लोढा स्थानिक अध्यक्ष प्रकाशजी दुगड,कार्यवाह अमरनाथजी खुर्पे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड, प्रेमकिशोरजी मानधने,विश्वासजी जोशी, जगदिशजी साखरे, तेजसजी महाजन, प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड, उपप्राचार्य डाॅ.गजानन होन्ना, उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख प्रा.युवराज मुळये, उपप्राचार्य प्रा.संतोष लिंबकर,अधिक्षक उतरेश्वर आनेवार,सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी अभिनंदन केले.
परभणी जिल्ह्यातील पहिलाच आमदार कोरोना पॉझिटिव, स्वतः आमदारांनी फेसबुक पेज वरून केले जाहीर