बदलापुर शहरात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाची स्थापना
बदलापुर, प्रतिनिधी – शहरातील नागरीकांच्या मुलभुत व इतर नागरी समस्यांकडे लक्ष देण्यासाठी कार्यरत आहे.नगरपालिकेच्या माध्यमातून शहर प्रवासी संघटनेने त्या सोडविलेल्या आहेत.अशा वेळी गृहनिर्माण सहकारी को.ऑप्रेटीव्ह सोसायटींच्या काही तक्रारी शहर प्रवासी संघटनेकडे येऊ लागल्या.
गृहनिर्माण सहकार्य संस्थांनमध्ये बिल्डरने करु न दीलेल्या सोसायट्या, इमारतीत रहात असणा-या भाडेकरुंचा हैदोस,सोसायटीतील हेवेदावे,काही वेळा घर मालकांचा उध्दटपणा अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या.हे सर्व प्रश्न व समस्या सर्वांच्या सहकार्याने व सामोपचाराने सुटाव्यात याकरिता सुधाकर पतंगराव यांच्या नेतृत्वाखाली”सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाची “स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या माध्यमातून कायदेशीर न्याय,सबलिकरण करुन समस्या सोडविणे,राज्यस्तरावरिल सरकारी निष्णात गृहनिर्माण संस्थांच्या सहकार्यांच मदत,सहकार्य व मार्गदर्शन घेणे,सुंदर बदलापुर शहर शांतता प्रिय कस होईल,याकडे लक्ष देणे, सहकाराची व्याख्याच मुळी शांततामय सहजीवन जगण्याची आहे.काही वाईट प्रवृत्ती बळावलेल्या आहेत, याकरिता सर्व शासकीय यंत्रणांची मदत घेऊन गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिका-यांवर अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळवून देण्यात येईल.एकीच बळ यशप्राप्तीकडे नेत असत.अशा सहकारी गृहनिर्माण सहकारी विविध समस्या सोडविण्यासाठी बदलापुर शहरातील सोसायट्यांनी महासंघामध्ये सामिल व्हावे.अधिक माहितीसाठी निमंत्रक बाळासाहेब सावंत 8928352532 व सुधाकर पतंगराव 9324060708 यांच्याशी या नंबरवर संपर्क साधावा.