Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1164

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1165

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1166

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1177

बिग ब्रेकिंग न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात २१ दिवसांसाठी लाॅकडाऊन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0 96

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून भारतातही त्याचे लोन पसरले आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे १० बळी गेले असून ५०० पेक्षा जास्त नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. या महामारीवर एकमेव उपाय असून तो म्हणजे  सोशल डिस्टंसिंग असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

त्यामुळे आज (मंगळवार) रात्री १२ वाजल्यापासून संपुर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. देशात हे लाॅकडाऊन येत्या २१ दिवसांसाठी असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. हे एक प्रकारचे कर्फ्यू असल्याचेच त्यांनी देशाला संबोधित करताना सांगितले. या महामारीशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.

कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. मोदी म्हणाले, ‘जनता कर्फ्यूने दाखवून दिले की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाहीत, असे नाही. पण, हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे.’

देशात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचे ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखेर पंतप्रधान मोदी यांनी भूमिका मांडत चित्र स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’ कोरोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्याने होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे आणि घरातच राहणे. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे. ध्यान देऊन ऐका. आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीने लागू केला जाईल,’ असे मोदी यांनी सांगितले.

देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणे. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत कोरोनाला घेऊन जाऊ शकते. ज्यावेळी करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसाराचा वेग खूप कमी होता. पण, त्यानंतर हे प्रचंड वाढले. मी देशवासियांना आवाहन करतो. त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. ही वेळ धैर्याने सामोर जाण्याची आहे. भारत अशा टप्प्यावर आहे. ज्यामुळे भारताला अनेक आर्थिक संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे. पण, एक लक्षात ठेवा जान है तो जहाॅन है,’ असे म्हणत मोदी यांनी देशवासियांना धीर दिला.

error: Content is protected !!