बियाणे चोरी प्रकरणातील चोरटा पौळपिंपरीत जेरबंद दिंद्रूड पोलिसांची कारवाई : १४ पर्यंत कोठडी
माजलगांव, प्रतिनिधी:- माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथील एका कृषी सेवा केंद्रावर १२ जूनच्या रात्री चोरट्यांनी डल्ला मारत एक लाखांचे कपाशी बियाणे चोरी केले होते . दिंद्रुड पोलिसांनी या प्रकरणी परळी तालुक्यातील पौळपिंपरी येथील एका चोरट्यास जेरबंद केले आहे .
खरिपाचा मौसम सुरु असल्याने कृषी दुकाने बी बियाणाने भरलेली आहेत . याचाच फायदा घेत दिंद्रुड येथील संभाजी चौकातील किसान कृषी केंद्रावर १२ जूनच्या रात्री दुकानाचा पत्रा फाडत चोरट्यांनी विविध कंपनीच्या कापसाच्या १४५ बॅग चोरी केल्या . दुकान मालक रामेश्वर मुंडे यांच्या फिर्यादीवरुन दिंद्रुड ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे , संतोष सरवदे यांनी एका अन्य गुन्ह्यात सिरसाळा पोलिसांच्या ताब्यात दिंद्रुड बियाणे चोरी प्रकरणातील आरोपी अशोक सानबा पवार असल्याच्या माहितीवरुन गुरुवारी रात्री सिरसाळा पोलिसांकडून हस्तगत केले . बियाणांचे दुकान फोडल्याचे सदर चोरट्याने कबूल केले आहे . माजलगांव येथील न्यायालयाने सदर चोरट्यास १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . या चोरीच्या घटनेत चार ते पाच अन्य चोरांचा समावेश असण्याची दिंद्रुड पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे .
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});