बीड जिल्ह्यातील शेतक-यांचा पीक विमा भरून घेण्याबाबत आदेश द्या
- अ.भा.किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांनी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांना केली मागणी
अंबाजोगाई,प्रतिनिधी – चालू वर्षी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांकडून पीक विमा भरून घेण्यामधुन फक्त बीड जिल्हा वगळला असून कोणतीच विमा कंपनी बीड जिल्ह्यातील शेतक-यांकडून विमा भरून घेण्यास तयार नाही.अगोदरच शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत बीड जिल्हा अग्रेसर असुन दररोज शेतकरी बांधवांच्या आत्महत्या वाढतच आहेत.अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शेतक-यांकडून पीक विमा भरून नाही घेतला तर शेतकरी आत्महत्याच्या प्रमाणात आणखीन भर पडेल . त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतक-यांचे खूप नुकसान होईल.
हे सर्व टाळण्यासाठी विमा क॔पण्यांनी बीड जिल्ह्यातील शेतक-यांचा पिक विमा भरून घेण्याबाबत विमा कंपन्यांना आदेश द्यावेत अशी मागणी अ.भा.किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष अॅङ माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब व मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
तीन वर्षांनंतरही मिळेनात फायदे ; विधवा स्त्रियांचे हेलपाटे निवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});