भरत व लक्ष्मण नवगिरे ह्यांचामुळे बदलापूर शहरात दोन MSEB कर्मचाऱ्यांना पुन्हा भेटले जीवदान

0 177

बदलापुर,जाफर वणू-बदलापुर पश्चिमेकडील रमेशवाड़ी रोडच्या लगत असणाऱ्या मुख्य विद्युत वाहिणीच्या पोलवर चढून काम करीत असताना एका महावितरण कर्मचाऱ्याला शॉक लागल्याची घटना दि.10 जून रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. सदर घटनेच्या सुमारास दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने विद्युत प्रवाह खंडित करून त्याला पोलावरुन खाली उतरताना दोघेही पडले.या घटनेच्या वेळेस तेथे उपस्थित असलेले शिवसेना शाखाप्रमुख भरत नवगिरे व त्यांचा मोठा भाऊ लक्ष्मण नवगिरे ह्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले.

 

बदलापुर पश्चिमेकडील रमेशवाड़ी या परिसरातील दत्त विहार संकुल इमारतीत मागील सतत 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने याची तक्रार MSEB कड़े करण्यात आली होती. या तक्रारीची दख़ल घेत MSEB चे दोन कर्मचारी या ठिकाणी पोहचले. सदर वेळेस विद्युत पुरवठा वाहिनीत काही तांत्रिक अड़चन आहे का याची दख़ल घेण्यास किशोर पवार हे कोणत्याही प्रकारे सुरक्षेतेची काळजी न घेता पोलवर चढून काम करत असताना एका महावितरण कर्मचाऱ्याला अचानक शॉक लागल्याचे समजतात खाली उभा असलेला दुसऱ्या कर्मचारी एकनाथ लाखाड़े याने प्रसंगावधान दाखवून तातडीने विद्युत प्रवाह खंडित करून अड़कलेल्या कर्मचाऱ्याला पोलावरुन खाली उतरताना दोघेही पडले. या घटनेच्या वेळेस तेथे उपस्थित असलेले वार्ड क्र. 16 चे शिवसेना शाखाप्रमुख भरत नवगिरे व त्यांचा मोठा भाऊ लक्ष्मण नवगिरे ह्यांनी आपल्या स्वतःच्या गाडीत टाकून दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने भागवती रुग्णालयात दाखल केल्याने दोघांनाही जीवनदान मिळाले आहे.

 

वार्ड क्र. 16 चे शिवसेना शाखाप्रमुख भरत नवगिरे व लक्ष्मण नवगिरे ह्यांच्या या कार्यास सलाम. यामुळे हे सर्व कार्य कुळगाव बदलापूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे ह्यांच्या आदेशाचे पालन करीत संपूर्ण बदलापूर शहरात शिवसैनिक सतर्क असतात.

 

महावितरण कर्मचारी हे पावसाळ्यापूर्वी काम करीत असताना अनेकवेळा अश्या घटना घडल्या असल्याने सर्व प्रकारची सुरक्षा उपकरणे घेऊन कर्मचाऱ्यांनी कामे करावी. अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लवकर बरा होऊन परत कामाला लाग, पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना फोन

 

error: Content is protected !!