भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे लागवड खर्च कमी करावा-कृषी शास्त्रज्ञ संतोष करंजे

0 126

भोर तालुक्यात कृषी दिन उत्साहात साजरा

कापूरहोळ, विठ्ठल पवार – आपला देश कृषिप्रधान असून अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. शेती टिकली तर देश टिकेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी काळाची गरज व भौतिक सुविधा ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भोर तालुक्यातील मुख्य भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे लागवड खर्च कमी करावा असे प्रतिपादन बारामती कृषी विज्ञान केंद्राचे पीक शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी केले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी दि. १ जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने माळेगाव येथे आयोजित कृषी दिन कार्यक्रमात संतोष करंजे बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, बारामती व कृषि विभाग पंचायत समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे माळेगाव येथील प्रगतशील शेतकरी तथा पंचायत समिती सदस्य व या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे लहूनाना शेलार यांच्या शेतावर कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती भोर चे सभापती .श्रीधर किंद्रे, सदस्य .रोहन बाठे, .लहुनाना शेलार, तालुका कृषि अधिकारी .हिरामण शेवाळे, शास्त्रज्ञ .संतोष करंजे, मंडळ कृषि अधिकारी राजेंद्र डोंबाळे, हेमंत ठोंबरे, विस्तार अधिकारी शिवराज पाटील, विनय कोळी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषि पर्यवेक्षक गणेश वैराळे,शिशुपाल सर्व कृषि सहाय्यक व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथून आलेले शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी यांत्रिकी भात लागवड, भात पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, ऊस पिकाची रोपवाटिका तयार करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पंचायत समिती भोर चे सभापती श्रीधर किंद्रे यांनी मा. मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली .तसेच शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले. पंचायत समिती भोरचे सदस्य रोहन बाठे यांनीही यावेळी कृषि क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली व लहुनाना शेलार यांनी केलेल्या यांत्रिकी भात शेतीमधील उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. यावेळी माळेगाव येथे तयार केलेल्या भात रोपवाटीकेची पाहणी करून यंत्राद्वारे भात लागवडचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पिक आहे, भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते परंतु सध्या मजुरांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब करावा, यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे वेळ व लागवड खर्चात बचत होऊन भात उत्पादनात वाढ होते. यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन मी शेतकऱ्याच्या शेतात येऊन देण्यासाठी तयार आहे परंतु शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व आपले यांत्रिकी भात शेतीमधील अनुभव सांगितले.
-लहुनाना शेलार, प्रगतशील शेतकरी तथा पंचायत समिती सदस्य

मागील तीन वर्षांपूर्वी कृषि विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत भोर तालुक्यात सुरु केलेल्या यांत्रिकी भात लागवड चळवळीचा आज पुणे जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, मावळ, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तसेच सातारा जिल्ह्यातही प्रसार झालेला आहे व शेतकरी मोठ्या प्रमाणात याचा अवलंब करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात शेतीला यांत्रिकीकरणाची जोड द्यावी व लागवड खर्चात बचत करून भात उत्पादनात वाढ करावी. मंडळ कृषि अधिकारी राजेंद्र डोंबाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.
-हिरामण शेवाळे, तालुका कृषि अधिकारी

धक्कादायक… मेथी समजून करून खाल्ली गांजाची भाजी आणि मग…
read this – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



error: Content is protected !!