मनमाड येथील सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने चायना वस्तूचे निषेध करण्यात आले
मनमाड , प्रातिनिधी – मनमाङ शहरातील सुभाष रोड येथे कन्फडरेशन ऑफ़ ऑल इंडीया ट्रेडर्स मनमाड शाखा आणि मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फे घोषणा देत तसेच सर्व चायना वस्तूंची होळी करण्यात आली.
चायनाने कोरोनाचा प्रसार जाणूनबुजून केला असल्याचा आरोप तसेच चिनने केलेल्या भ्याड हल्यात भारतीय २० जवान शहीद झाले.या भ्याड हल्याच्या निषेर्धात चायना मोबाईल व चायना वस्तुची होळी करत वस्तू फोडून चीनचा निषेध केला.तसेच चिन देशातील कोणतेही वस्तू खरेदी आणि विक्री करणार नाही असा निर्धार व्यापाऱ्यांनी केले.
चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आले. “मुर्दाबाद मुर्दाबाद चायना मुर्दाबाद “, “भारत माता की जय, वंदे मातरम ” अशा विविध घोषणा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आले.
याप्रसंगी कल्पेश बेदमुथा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, अरूणभैय्या सोनवणे,योगेश भंडारी, गुरूदीपसिंग कांत, राकेश ललवाणी,शामकांत शिरोडे,संतोष लुणावत, दिपक शर्मा,किशोक नावरकर,आनंद लोढा,परेश बुरड,बलबीरसिंग कांत,संजय मुथा,प्रफुल्ल बोगावत,सागर शिनकर, अभिजित लोढा,इंजी.संदेश बेदमुथा,भरत छाबडा,कुमार मेहानी,सुधिर बेदमुथा आदी उपस्थित होते.
योग दिना निमित्त ‘राज योग मेडिटेशन ‘विषयावर वेबिनार
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});