मनिषा वाल्मीकीवर बलात्कार करण्यार्‍या नराधमास फाशी द्या- प्रकाश गजभिये

0 85

मुंबई, प्रतिनिधी – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाड़ीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांना राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मा आमदार प्रकाश गजभिये ह्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात भेट दिली.

यावेळी मा आमदार प्रकाश गजभिये यांनी उत्तरप्रदेशात हातरस ज़िल्हयातील चांडपा गावातील मनिषा वाल्मीकी १९ वर्षाच्या दलित युवतीवर सामूहिक बलात्कार करुन चार नराधमानी अमानुष पने तीची जीभ कापली व तीचे मनके तोडले डोळे फोडले व तिच्यावर अत्याचार केला. त्यामुले उत्तर प्रदेशात दलितांना जीवन जगने कठिन झाले आहे म्हणून अश्या आरोपी नराधमांवर कठोर शिक्षा होऊन फ़ाशी झालीच पाहिजे अशी शिफारस उत्तर प्रदेश सरकारने करावी व पीड़ित मूलीच्या परिवारास महाराष्ट्र शासनाकडून 25 लाख रुपयाची आर्थिक मदत करावी अशी विनंती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मा आमदार प्रकाश गजभिये ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना करण्यात आली. यावर मुख्यमंत्री साहेब व आम्ही या कूटूम्बियांच्या दुखात सामिल आहोंत तसेच त्यांना जी मदत लागेल ती मदत आमच्याकडून करण्यात येईल असे यावेळी सांगितले. या निवेदनाची प्रत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांना सुद्धा देण्यात आले आहे.

error: Content is protected !!