माजलगांव तालुक्यात युरिया खताचा काळा बाजार

0 119

माजलगांव,प्रतिनिधी:-  खरीप हंगामात रासायनिक खताची गरज असतांना युरिया खताची व्यापार्‍यांनी कृत्रिम टंचाई केली असून यावर प्रशासनाचा कुठलाही
अंकुश नसल्याचे दिसूून येत आहे. खताच्या टंचाईमुळे शेतकर्‍यांना चढ्या
भावाने खत खरेदी करावे लागते. माजलगांव येथे आज खतासाठी अनेक शेतकरी
तालुका कृषी कार्यालयात आले होते. मात्र कृषी अधिकारी हजारे कार्यालयात
हजर नव्हते. दोन दिवसात खत उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खत पेरून आंदोलन करू असा इशारा थावरे यांनी दिला आहे.अधिकारी आणि व्यापार्‍याचं साटेलोटे असल्याने  खताचा काळाबाजार होत असल्याचे थावरे यांनी म्हटले आहे.

यावर्षी सर्वत्रच युरिया या रासायनिक खताची टंचाई निर्माण करण्यात आली.
या टंचाईमध्ये व्यापार्‍यांचा तितकाच सहभाग आहे. काही व्यापारी चढ्या भावाने युरिया खताची विक्री करतात. माजलगांव तालुक्यात ऊसाचं क्षेत्र जास्त असल्याने शेतकरी खत खरेदी करण्यासाठी बाजारात जातात.

मात्र बाजारात खत उपलब्ध नाही. आज सकाळी काही शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आले होते. कार्यालयात कृषी अधिकारी हजारे उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात होता. येत्या दोन दिवसात खत उपलब्ध न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खत पेरून आंदोलन केले जाईल असा इशारा गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!