माजलगावात पोलिसांची अनोखी शक्कल; सकाळी फिरायला जाणाऱ्यांकडून घाम निघेपर्यंत करुन घेतला व्यायाम

0 90

माजलगाव, (धनंजय माने) – कोरोनाची कसलीच भीती वाटत नाही असे काही शहरातील लोक सकाळी मॉर्निंग वॉक व पोहायला घराच्या बाहेर पडत आहेत. माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अविनाश राठोड यांनी काल गुरुवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजता मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांना केसापुरी कॅम्पपासून सर्वांना एकत्र करून संभाजी चौकात अंगातून घाम निघेपर्यंत व्यायाम करून घेतला आहे.

मॉर्निग वॉकच्या नावाखाली बाहेर फिरायला जणान्याचे ताटलेले अंग मोकळे करण्यासाठी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी पोलीस बंदोबस्तात संभाजी चौकात अंगातून घाम निघेपर्यंत एक तास व्यायाम करून घेतला. यामुळे मॉर्निग वॉक च्या नावाखाली बाहेर गप्पा मारणाऱ्यांना चांगलाच चाप बसला असल्याचे दिसत आहे. या महामारीत सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःची सुरक्षा करत दुसऱ्याची ही काळजी घेतली पाहिजे अशी समज सुरेश बुधवंत मॉर्निग वॉकला बाहेर पडणाऱ्यांना यावेळी दिली.

तासभर प्राणायामाची शिक्षा देत पुढे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्याची दिली वार्निंग

देशात राज्यात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शेजारी जिल्ह्यात ही कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. अशा स्थितीत माजलगाव शहरातील काही हौशी मंडळी आरोग्यम् धनसंपदा सांभाळण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी पहाटे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले होते. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी जमाव बंदी असताना पहाटेच्या काळात लोक रस्त्यावर दिसू लागले होते. आशा जवळपास तीस लोकांना माजलगांव शहर पोलिसांनी पहाटे संभाजी चौक येथे ताब्यात घेतले. यावेळी त्यांना शिक्षा म्हणून तासभर त्यांच्याकडून प्राणायम करून घेतला . दरम्यान यावेळी त्यांना पुढे संचार बंदीचे नियम मोडल्यास कायदेशीर कार्यवाहीस तोंड द्यावे लागणार अशी वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आले.

जबाबदारीचे भान ठेवावे – पो. नि. सुरेश बुधवंत

आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूला कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरिकांनी ही महामारी आपल्या जिल्ह्यात घुसू न देण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हे भान नागरिकांनी लक्षात ठेवून घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांची ही जबाबदारी ही आहे आणि कर्तव्य ही. त्यामुळे एका जबाबदारीतून सामाजिक अंतर राखण्यासाठी घरीच बसावे व सुरक्षित राहावे असे आव्हान माजलगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!