पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल

0 172

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे केली. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे.

 

इतर माहितीसाठी कोणते संकेतस्थळ

दुपारी एक वाजता खालील संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्याला विषयनिहाय मिळालेले गुन देण्यात येतील. या गुणांची विद्यार्थ्यांना प्रिंट आउटही घेता येईल. विशेष म्हणजे https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल

1. https://mahresult.nic.in

2. http://sscresult.mkcl.org

3. https://sscresult.mahahsscboard.in

4. https://results.digilocker.gov.in 

5. https://results.targetpublications.org

दरम्यान, जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 31/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!