कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडला कलाकाराच्या जगण्याचा आकांत

कलावंत मराठी प्रस्तुत, ‘घुंगराची चाळं’ गाण प्रदर्शित

0 51

कलाकाराचं आयुष्य सोप्प नसतं. कलाकार मेहनत, जिद्द, काबाडकष्ट, मानअपमान तसंच संघर्ष कित्येक वर्षे करत असतो. तो दिवसागणिक घडत असतो. अश्याच एका कलाकाराच्या संघर्षाची खरी कहाणी कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडली आहे. खरतरं या गाण्याच्या टिझरनंतर सोशल मीडियावर गाण्याचं भरभरून कौतुक झालं. आता नुकतच हे गाणं प्रदर्शित होताचं. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं कलाकार किरण कोरे याच्यावर चित्रीत झालं असून यात सुप्रसिद्ध लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर, निकीता भोरपकर आणि निलेश मुणगेकर हे कलाकार देखिल आहेत. हे गाणं दर्शन घोष यांनी लिहीलं असून दिग्दर्शन ही त्यांनीच केलं आहे. शिवाय हे गाणं शुभम दुर्गुळे याने गायलं असून या गाण्याचे बोल ही लिहीले आहेत. या गाण्याचं संगित विपुल कदम यांनी केले आहे. घुंगराची चाळ या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर हे आहेत.

 

 

दिग्दर्शक दर्शन घोष गाण्याविषयी सांगतात, “अत्यंत आनंद होत आहे की, शंकर बाबा या गाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर घुंगराची चाळ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आणि ते गाणं सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. घुंगराची चाळ हे नुसतं गाणं नसून अनेक लोखो कलाकारांच्या जगण्याचा आकांत मी दाखवण्याचा या गाण्यातून प्रयत्न केला आहे. कलावंत मराठीच्या टीमची यात खूप मेहनत आहे. यापुढे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, खासकरून सामाजिक विषयांवर गाणी करण्यासाठी कायम प्रयत्नशील असू.”

 

 

निर्माते निलेश मनोहर मुणगेकर कलावंत मराठीविषयी सांगतात, “कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. हाच माझा कायम हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा किंवा मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आत्तापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी १०० हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन.कलावंत मराठीच्या घुंगराची चाळ या गाण्यासोबतच सर्व कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो. हीच सदिच्छा!!”

error: Content is protected !!