विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण-रामेश्वर नाईक यांचे प्रतिपादन

बालनाट्य शिबिराचे उद्धाटन

0 162

परभणी,दि 06 ः
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि विद्यार्थी सुसंस्कृत व्हावा यासाठी जीवनात कलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठीच नाट्य कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले
यश चॅरिटेबल ट्रस्ट परभणी, बालरंगभुमी परिषद जिल्हा शाखा परभणी व परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ( PAS) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ बालरंगोत्सव ‘ बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य कलावंत डॉ. अर्चना चिक्षे, उद्घाटक डॉ. रामेश्वर नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सिद्धार्थ मस्के, सुधीर सोनूनकर आदींची उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, व ना म कृ विद्यापीठ परभणी येथे पाच दिवसीय नाट्य कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दहा मे पर्यंत हे शिबिर चालणार आहे.
या शिबिरात पहिले सत्र अभिनय क्षेत्रात अनेक पदके मिळवलेल्या डॉ. अर्चना चिक्षे यांनी घेतले. पुढील चार दिवसांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाट्य व चित्रपट क्षेत्रातील प्रा. देवदत्त पाठक , मिलींद केळकर , गोपी मुंडे, किशोर पुराणिक , सुनील ढवळे, डॉ सिद्धार्थ मस्के, त्र्यंबक वडसकर आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ परभणी , राजीव गांधी युवा फोरम परभणी यांच्या वतीने शिबिरातीला विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुप्रिया श्रीमाळी, दत्तराव बनसोडे, महेश शेवाळकर, विशाल पाटील, सपना वैष्णव, प्रकाश पंडित, मारोती वाघमारे, छाया गायकवाड, देवीदास शिंपले, दीपाली पाटील, श्रीकांत कुलकर्णी,संजय पांडे आदींनी परिश्रम घेतले. ।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य त्र्यंबक वडसकर यांनी केले तर आभार मारोती वाघमारे यांनी मानले.

error: Content is protected !!