मतदान केल अन…… थेट  ईव्हीएम मशीनच पेटवली..

0 228

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदाराकडून ईव्हीएम मशीन (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना समोर आली आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

माढा लोकसभा अंतर्गत सांगोला तालुक्यात सकाळपासून मतदान शांततेत सुरू होते. मात्र दुपारी तालुक्यातील बागलवाडी या मतदान केंद्रावर एक अनुचित प्रकार घडला. या मतदान केंद्रावर दादासो मनोहर तळेकर हे मतदान करण्यासाठी गेले. त्यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून मतदान केले. त्या नंतर त्यांनी खिशातून एक बाटली काढली आणि त्याने खिशातील बाटलीतील ज्वलनशील पदार्थ काढून मतदान मशीनवर टाकून ती पेटवून दिली. हि बाब उपस्थित कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्यावर तात्काळ मशीनवर पाणी टाकले. त्यावेळेस तळेकर हे पळून जात होते. मात्र मतदानासाठी आलेले नागरिक आणि पोलिसांनी तातडीने त्याला पकडले. मात्र या प्रकारामुळे मतदान थांबविण्यात आले. बागलवाडी मतदान केंद्र प्रमुखांनी या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठांना दिली.काही वेळाने मतदान प्रकिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.

error: Content is protected !!