सर्वात मोठी बातमी..अजित पवार गटातील आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत…

0 94

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात भाजप आणि महायुतीची चांगलीच दाणादाण उडाली. तर राज्यात मविआने ३० आणि महायुतीने १७ जागांवर विजय मिळवला. अजित पवार गटातील आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे काही दावे केले जात आहेत. अशातच शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

अजित पवारांच्या गटातील १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असं दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं, असंही रोहित पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आमदार पवार यांनी आज बुधवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांना पत्रकारांशी संवाद साधले. आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जशराज पाटील, सौरभ पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.

10 आमदारांचा सुप्रिया सुळेंना मेसेज

अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवले आहेत. आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न  केला असल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळं  अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. किमान १० आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अजित पवारांच्या आमदारांमध्ये चलबिचल

एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना प्रयत्न केल्याची बातमी आहे. महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांकडून सुप्रिया सुळेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

error: Content is protected !!