एरंडेश्वर येथे महाबीजने घेतली शेती कार्यशाळा

0 92

पूर्णा, दि.५ ः
एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथे दि.५ बुधवार रोजी महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या (महाबीज) वतीने खरीप हंगामासाठी परिसरातील गावातील शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन कार्यक्रमात  शेती कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन कलंत्रे, व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून वल्लभराव देशमुख संचालक महाबीज अकोला, संतोष भालेराव तालुका कृषी अधिकारी पूर्णा, जि.डी. गडदे कृषी विस्तार विद्यावेत्ता व.ना.म.कृषी विद्यापीठ परभणी, दीपक दहे व्यवस्थापक उमेद अभियान परभणी, आर.आर.राठोड महाबीज जिल्हा व्यवस्थापक परभणी, अशोकराव काळे मा. प्रकल्प संचालक आत्मा, बी.एस.पवार जिल्हा व्यवस्थापक, उत्तमराव कदम मा.संचालक महाबीज,
सचिन काळे कृषी क्षेत्र अधिकारी पूर्णा यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४ मध्ये महाबीज द्वारे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, इत्यादी पिकांची उपलब्ध असलेली मूलभूत व पायाभूत बियाणे, बीज प्रक्रिया, जैविक उत्पादन, वीजप्रक्रिया नंतर कीड विषयी फवारणी कोणती करावी पिकाची संगोपन आणि पिकांचे जास्त प्रमाणात उत्पादन कसे घ्यावे आदि विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक आर.आर.राठोड तर आभार प्रदर्शन सुदाम पाटील यांनी केले. यावेळी परिसरातील महाबीजचे असंख्य भागधारक, बिजोत्पाक शेतकरी, महिलांची विशेष उपस्थिती होती

error: Content is protected !!