उद्धव ठाकरेंनी ५० कोटी मागितले मी लगेच दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

1 274

कोल्हापूर – शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोल्हापूरात महाअधिवेशन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (cm eknath shinde) यांना या अधिवेशनात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली.

 

कोल्हापुरमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे (chief minister eknath shinde has revealed a big secret). आमच्या सोबत 50 आमदार आणि 13 खासदार आणि बरेचसे शिवसैनिक आले आहेत. जो गेला की लगेच त्यास गद्दार ठरविता. हेच कार्यकर्ते तुम्हाला कचऱ्यात घालतील आणि ‘हम दो हमारे दो’ अशी परिस्थिती तुमच्यावर येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले. धनुष्यबाण निशाणी आम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही पक्ष निधीचे 50 कोटी लगेच मागून घेतले. आम्हाला पैसा नको बाळासाहेबांचे विचार हवेत म्हणून आम्ही लगेच पैसे देऊन टाकले. 50 कोटी मागताना जनाची नाही तर मनाची लाज पाहीजे होती. तुमच्यावर आलेली संकटे मी छातीवर घेतली आहेत. आपल्याजवळ बोलण्या सारख्या खूप गोष्टी आहेत. वेळ येईल त्यावेळी मी बोलेल असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

 

 

बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शिवसेना अशीच मोठी झाली नाहीय. रक्ताचे पाणी केले लोकांनी, घरावर तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर रांगोळीही नीट मारता आली नाही. मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केले, असला कोणता पक्ष प्रमुख असतो जो नेत्यांचा पानउतारा करतो, असा सवाल शिंदे यांनी केला. कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनी असे काय मागितलेले की त्यांचा तुम्हाला त्रास होत होता, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

 

 

नक्षलवाद मोठं का सरकार मोठं ? गडचिरोलीमध्ये जाऊन मी कारखाना सुरू केला. 20 हजाराची गुंतवणूक आता करतोय. प्रत्येकाला नोकरी मिळेल असे काम आपण करतोय, अनेक उद्योजक आमच्या मागे लागले आहेत. मागे मला गडचिरोलीत धमकी आली मी कुणाला घाबरलो नाही माझा बाल बाका झाला नाही. मला झेड प्लस सुरक्षा दिली नाही, मी निधड्या छातीचा एकनाथ शिंदे आहे. काय तुमच्या मनात होतं नक्षल्यानी हत्या करावी अशी शंका उपस्थित होत आहे, कारण मी तुमची अडचण होतो असा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

error: Content is protected !!