अररर नुसता उकाडा,घालमेल..परभणीवर सुर्य कोपला,तापमान 44 अंशावर

0 147

परभणी,दि 25 ः
शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढत होत आहे.शनिवार , दि.25 मे रोजी शहरात 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या  हवामान शास्त्र  विभागात आज नोंदवण्यात आलेले तापमान यावर्षीचे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे.

 

परभणी जिल्ह्यात यावर्षी अतिशय अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी मार्च महिन्या पासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढताना दिसून येत होता. मार्च महिन्यात तापमानाने अनेकवेळा ४० अंशाचा पारा ओलांडला होता. परंतू गेल्या महिन्यात अनेकवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात चढ- उतार दिसून आला. परंतू मे महिना सुरू होताच जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.सातत्याने तापमान 42 अंशाच्या पुढे आहे.शनिवारी तापमाने कहर केला.तापमान थेट 44 अंशावर पोचले.

error: Content is protected !!