माणगांव तालुक्यातील विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्यांचे ( कोवीड योद्यांचे ) अथक प्रयत्न
बोरघर / माणगांव , विश्वास गायकवाड – निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात ०३ जून रोजी सर्वत्र हाहाकार माजवला या नैसर्गिक आपत्ती मध्ये जिल्ह्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या मध्ये महावितरणचे सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जिल्ह्यात सर्वत्र विद्युत पुरवठा करणार्या महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे.
सोसाट्याच्या वार्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणचे विद्युत पोल, विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि विद्युतवाहक तारा यांच्यावर मोठ मोठी झाडे मोठ्या प्रमाणात तुटून व उन्मळून पडल्या त्यामुळे जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा जमीनदोस्त झाली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नेस्तनाबूत झालेली महावितरणची विद्युत वितरण यंत्रणा पुन्हा उभी करून विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी जनतेचे देवदूत, कोवीड योद्धे माणगांव तालुका महावितरणचे कर्तव्यदक्ष उप कार्यकारी अभियंता माननीय श्री विजय मोरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता श्री सातपुते साहेब आणि प्रधान तंत्रज्ञ श्री किर्तिराज शिर्के, वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश तेटगुरे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस डी जाईलकर, वरिष्ठ तंत्रज्ञ राजश्री सानप, वीज सेवक अविनाश सोलंकी, आऊट सोर्स कर्मचारी मंगेश तोंडलेकर, रामभाऊ वाढवळ, नितीन धसाडे इत्यादी कर्मचारी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्या नंतर दुसऱ्या दिवसापासून उन, वारा, पाऊस, कोवीड इत्यादींची तमा न बाळगता कोरोना विषाणू निर्मुलन पार्श्वभूमीवरील शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आपल्या अत्यावश्यक सेवेच्या जबाबदारीचे भान ठेवून जनतेला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी आणि त्यांचे जीवन प्रकाशित करण्यासाठी दिवसरात्र एक करून निसर्ग चक्रीवादळामुळे खंडीत झालेला माणगांव तालुक्यातील वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
माणगांव तालुका महावितरणच्या वरील टीमने उप कार्यकारी अभियंता माननीय श्री विजय मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माणगांव महावितरण ग्रामीण शाखा अंतर्गत माणगांव तालुक्यातील खरवली पेण बोरघर विभाग, माणगांव अदिवासी वाडी ते पाणोसे, गांगवली, विंचवली, होडगाव, हातकेली, जावळी, मुगवली ईत्यादी विभागात निसर्ग चक्रीवादळाने पडलेले शेकडो विद्युत पोल, तारा आणि विद्युत ट्रान्सफॉर्मर इत्यादींच्या पुनर्उभारणीचे काम मोठ्या परिश्रमाने अथकपणे युद्ध पातळीवर आजवर निरंतर सुरू ठेवले असून थोड्याच दिवसात संपूर्ण माणगांव तालुक्यातील खंडीत झालेला विद्युत पुरवठा पुर्ववत होवून माणगांव तालुक्यातील जनतेचे जीवन प्रकाशित होणार आहे.
योग दिना निमित्त ‘राज योग मेडिटेशन ‘विषयावर वेबिनार
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});