माळी समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व द्या – सावता सेनेची मागणी

0 437

माजलगांव ,(प्रतिनिधी):-ओबीसींचा मुख्य घटक असलेल्या माळी समाजाची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. मात्र, या समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगती न झाल्याने हा समाज सत्तेपासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी सावता सेनेच्या वतीने करण्यात आली आहे प्रस्थापित पक्षांनी माळी समाजासह ओबीसींचा आजपर्यंत निवडणूकी पुरता वापर करून घेतला आहे.

निवडणूकीत सत्तेचे आमिष दाखवून सत्ता हस्तगत केली, आसा आरोप सावता सेनेचे तालुका अध्यक्ष राम कटारे यांनी केला आहे. माळी समाजासह ओबीसीं समाजात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध समस्या आसताना या समस्या सोडविण्यासाठी ओबीसीं समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून विधानपरिषदेवर हुशार, कतृत्वान सामाजिक कार्य करणार्या ओबीसी नेत्यांना संधी द्यावी जेणेकरून ओबीसी समाजाच्या विविध समस्या सुटतील.

माळी समाजाचे माजी नगराध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते भास्कर अंबेकर तसेच आ.बळीराम सिरसकर यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता त्यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी सावता सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

परळीतील पत्रकार शेख गौस उर्फ बाबा कोरोना योध्या ने सन्मानित

 

error: Content is protected !!