मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची नियुक्ती करण्यात यावी
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतिने,मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
माजलगांव, प्रतिनिधी:- महाराष्ट्रात मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूका राज्य शासनाने लांबणीवर टाकल्या असुन मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणुका करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला असुन ग्रामपंचायतीवर प्रशासकाची निवड संबधीत जिल्हायाच्या पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार करण्यात येणार असल्याने,मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची नियुक्ती करण्याची मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा माजलगांवच्या वतिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दि १७ जुलै गुरुवार रोजी मेलद्वारे दिलेल्या निवेदनात केली आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतिने मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्राशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची निवड करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री धनजंय मुंडे यांना मेलेद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार मा.राज्यपाल यांनी २०२० च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी प्रशासक न ठेवता गावातील नागरीक प्रशासक नियुक्त करावा हे नमुद केले आहे.तेंव्हा गावातील नागरिक प्रशासक नियुक्त करताना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाने केली आहे.
पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी.पत्रकार हाच प्रशासक पदाचा प्रमुख दावेदार आहे, तसेच ज्या गावात पत्रकार नसेल त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी,असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
त्यामुळे मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची निवड करण्याची मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यध्याक्ष विलास कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्यातील,राज्य स्तरावर राज्य कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी,व तालुका कार्यकारणीची वतिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व संबधीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मेलद्वारे करण्याची सुचाना दिली त्याआनुषंगाने माजलगांव महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतिने मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक पत्रकारांची निवड करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्याकडे संघाचे अध्यक्ष वहिद खाँ.हिदायत खाँ.पठण,उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे व सचिव बाळासाहेब आडागळे यांनी निवेदनाद्वारे दि १७ जुलै गुरूवार रोजी मेलद्वारे मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्यातील पहिलाच आमदार कोरोना पॉझिटिव, स्वतः आमदारांनी फेसबुक पेज वरून केले जाहीर