मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिम्मित मोफत धान्याचे वाटप – नगरसेविका सौ. निश सागर घोरपडे
बदलापुर, जाफर वणू – संपूर्ण देशभरात सरकारने लॉकडाउन घोषित केले असल्याने या “कोरोना वायरस” चा संसर्ग टळत नसल्याचे लक्षात येताच या लॉकडाउनमध्ये घरात बसलेल्या गोरगरीब व बेरोजगार मुस्लिम बांधवांना “काम नाही, तर पैसा नाही, मंग जगायचे कसे” हा प्रश्न त्यांच्यासमोर येताच “मुस्लिम बांधवांना रमजान ईद” करण्यास मदत करण्याकरीता कुळगाव बदलापुर नगरपरिषद नगरसेविका निशा सागर घोड़पडे ह्यांच्याकडून प्रभागात राहणाऱ्या 13 लोकांना घरोघरी जाऊन रेशन, धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. ही मदत करत असताना सोशल डिस्टेंसची विशेष काळजी घेण्यात आली असल्याची माहिती निशा घोड़पडे ह्यांनी दिली.
यामुळे वॉर्ड क्र. 17 मधील “मुस्लिम बांधवांना रमजान ईदिकरिता” मदत केल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी बदलापुर वॉर्ड क्र.17 च्या भाजपा नगरसेविका सौ. निशा सागर घोड़पडे, उद्योजक सागर घोड़पडे, शहराध्यक्षा मीनल मोरे, समाजसेवक स्वप्निल सावंत ह्यांच्यासह आदी कार्यकर्ता व मान्यवर उपस्तिथ होते.