मोटर सायकल चोरांना पोलिसांकडून अटक, ४ गाड्या जप्त
हिंगणघाट – शहरातील उज्वल निर्मल पत संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे सतर्कतेमुळे मोटरसायकल चोरांना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. अंदाजे 93,000 रूपये किमतीच्या 4 मोटरसायकल कारवाईदरम्यान जप्त करण्यात आल्या.
हिंगणघाट शहरात गेल्या तिन-चार दिवसापासुन मोटरसायकल चोरीचे चार गुन्हयाची नोंद झाली असता, हिंगणघाट येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे चमुने प्रयत्न करीत शहरातील नागरीकांचे मदतीने चार सायकल चोर इसमांना ताब्यात घेतले.
आरोपी शहरातील निर्मल उज्वल पत संस्थेतील कर्मचाऱ्यांनी पतसंस्थेसमोर ठेवून असलेली दुचाकी पळवून नेण्याचे प्रयत्नात असतांना तेथील कर्मच्याऱ्यांचे लक्षात आले,पतसंस्थेतील कर्मचारी शितल गायकवाड़ ,अमोल झाड़े यांनी यांनी त्या आरोपींना उपस्थित नागरिकांच्या मदतीने पकड़ले व त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली, पोलिस घटनास्थळी पोचताच त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.आरोपिना पोलिसी हिसका दाखविताच आपला गुन्हा कबूल केला. गुन्हयातील 4 मोटरसायकली जप्त केरण्यात आल्या.
आरोपी चेतन रामभाऊ कुडमेथे, वय 30 वर्ष, रा. मुजुमदार वार्ड, अमोल नागोराव बावणे, वय 28 वर्ष, रा. कोचर वार्ड, विक्रम राजकुमार नेताम, वय 29 वर्ष, रा. शास्त्री वार्ड, गणेश बाबुराव गुंजेकार, वय 33 वर्ष, रा. कोचर वार्ड,सर्व हिंगणघाट येथील रहिवासी असलेल्याआरोपींना अटक करण्यात आली , सदरआरोपिंनी गुन्हे केल्याचे कबुली दिली,गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पुढील कारवाई केली.
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
IPL : आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून विविध पर्यायांवर विचार सुरु
अनलॉक 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील