राजगृहावरील भ्याड हल्याचा जाहिर निषेध आरोपीला अटक करुन कडक कारवाई करावी – प्रा.दासू वाघमारे

0 153

परळी ,प्रतिनिधी -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान व सर्व बहुजनांचे श्रद्धास्थान असलेले राजगृह या राजगृहावर काही अज्ञात समाज कंटकांनी जो भयानक हल्ला करून जे नुकसान केले आहे त्याचा सम्राट अशोक विचार मंच रेल्वे टेशन परळी च्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना व डेप्युटी हकलेक्टर परळी यांच्या मार्फत निवेदन सादर करून सदरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. व आरोपीस कडक शासन करावे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. दासू वाघमारे यांनी केले आहे.

सम्राट अशोक विचार मंच परळी च्या वतीने उपविभागीय अधिकारी परळी यांना वरील मागण्यांचे व निषेधाचे निवेदन आज दि.९/०७/२०२० रोजी देण्यात आले यावेळी सम्राट अशोक विचार मंचाचे प्रा. दासू वाघमारे, सुभाष वाघमारे,बी.ए. वडमारे, आर.एस. दहीवाडे, अशोक वाघमारे, शिवाजी बनसोडे,एस.एस.सोनवणे, रावसाहेब जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अबब… वनामकृविचे सोयाबीन बियाणे नापास, शेतकर्‍यांची फसवणूक

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

 

error: Content is protected !!