अबब… वनामकृविचे सोयाबीन बियाणे नापास, शेतकर्यांची फसवणूक
वनामकृवितील वादग्रस्त कार्यपध्दतीचा पंचनामा भाग-3
परभणी, प्रतिनिधी – परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे सोयाबीन वाण एमएयुएएस-71 पैदासकार व पायाभूत बियाणे नापास झाले असल्याने शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
परभणी येथील वनामकृवित शेतकर्यांसाठी पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात येत असतो. त्यामुळे येथील संशोधन हे दर्जेदार असून येथून चांगल्या प्रतीचे बियाणे शेतकर्यांना मिळावे अशी माफक अपेक्षा शेतकर्यांची असते. परंतु सन 2018-19 मधील वनामकृवि अंतर्गत सोयाबीन एमएयुएस-71 या वाणाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम अनुवांशिक शुध्दतेअभावी संपूर्ण बिजोत्पादन कार्यक्रम बाद ठरलेला आहे. त्यामुळे विद्यापीठावर मोठी नामुष्की ओढावली आहे. विद्यापीठाच्या बदनामीबरोबरच मोठे आर्थिक नुकसानही झालेले आहे. बियाणे उत्पादन कार्यक्रमात बियाण्यांची अनुवंषीक शुध्दता राखण्याकरिता योग्य ती खबरदारी घेतल गेली नाही. यामुळे विद्यापीठ प्रतिमेला गालबोट लागण्याबरोबरच आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
या संदर्भात कुलगुरूंनी केवळ चार ओळीचे एक पत्र काढून ही बाब संशोधन संचालकांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यात भविष्यात विद्यापीठाच्या वतीने वेगवेगळ्या पिकांचा जो बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे त्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयाचे आपल्या स्तरावर तसेच सर्व संबंधितांकडून काटेकोर पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. भविष्यात असा हलगर्जीपणा दिसून आल्यास संबंधितांवर आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही होईल अशा प्रकारच्या सुचना देण्यात याव्यात असेही नमुद केलेले आहे.
विद्यापीठाने सोयाबीन एमएयुएस-71 हे भेसळयुक्त बियाणे महाबीज व शेतकर्यांना पुरवठा केले आहे. त्यामुळे शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, तसेच विद्यापीठामधील संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली अथवा करण्यात येत आहे अशी विचारणा आता शेतकर्यांतून होत आहे. तसेच कारवाईतील विलंबामागचे गौडबंगाल काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
Part 1 : वनामकृविचा सुरक्षा यंत्रणेवर लाखोंचा खर्च; महागड्या कंपनीसोबत अर्थपूर्ण व्यवहार
part 2 : स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल