स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?

6 349

वनामकृवितील वादग्रस्त कार्यपध्दतीचा पंचनामा ः भाग-2
परभणी, प्रतिनिधी –
मागील काही महिन्यांपासून परभणीतील वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाच्या कारभाराचे एकेक किस्से बाहेर येत आहेत. तसेच अनेक वादग्रस्त निर्णयांसह एकूणच कुलगूरू व कुलसचिवांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता कोरोनामध्येही तातडीची बैठक घेवून कुलगुरूंनी स्वतःच्या नातेवाईकाची पदोन्नती केल्याची चर्चा समोर आल्याने नवीनच वादाला तोंड फुटले आहे.

लोकसेवा मल्टिसर्व्हिसेस Lokseva Multiservices

कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शासनाने 18 मार्च, 20 मार्च व 23 मार्च रोजी कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत शासन निर्णय काढला होता. त्यानुसार शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत काही बंधने घातली होती. यात 18 मार्च रोजीच्या शासन निर्णयानूसार कर्मचार्‍यांना आळीपाळीने बोलवून केवळ 50 टक्के उपस्थितीत कामे करण्याचे आदेश होते. तसेच 23 मार्चच्या शासन निर्णयानूसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती 5 टक्के ठेवण्यात यावी. यासाठी संबंधित विभाग प्रमुख वा कार्यालयीन प्रमुखांनी उपाययोजना करावी असे आदेश होते.

 

याचा अर्थ या कालावधीत शासकीय कार्यालयांत पुरेसे अधिकारी / कर्मचारी उपस्थित नव्हेते. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयात अत्यंत तुटपूंजी उपस्थिती असताना कुठलीही बैठक घेणे शक्य नव्हते. तरी सुध्दा विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरूंच्या नातेवाईकाच्या पदोन्नतीकरिता पदोन्नती समितीची बैठक तातडीने घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार दि. 23 मार्च रोजी तातडीने बैठक घेवून श्रीमती मनिषा देविदास बगाडे, कनिष्ठ लिपीक यांना वरिष्ठ लिपीक या पदावर पदोन्नती देण्यात आली. या बैठकीला कोण कोण उपस्थित होते व इतक्या तातडीने बैठकीचे आयोजन का करण्यात आले असे प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

 

वनामकृविच्या कुलगुरू व कुलसचिवांच्या कार्यपध्दतीवर सध्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठाचे अनेक प्रताप समोर येत असून यातून परभणीतील नावाजलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. नुकतेच अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न, ई-निविदेचा विषय, महागडी सुरक्षा व्यवस्था, पदोन्नती, माहिती अधिकाराच्या अर्जांमुळे त्रस्त झालेले विद्यापीठ आदी विषयांमुळे विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

Part 1 : वनामकृविचा सुरक्षा यंत्रणेवर लाखोंचा खर्च; महागड्या कंपनीसोबत अर्थपूर्ण व्यवहार
महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१



error: Content is protected !!