महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१

3 196
पुणे, सदाशिव पोरे – महावितरणने विद्युत सहाय्यकच्या ५ हजार आणि ऊपकेंद्र सहाय्यकच्या २ हजार जागांसाठीची जाहिरात एप्रिल/मे २०१९ मध्ये जाहीर केली होती. जुलै २०१९ मध्ये ऊपकेंद्र सहाय्यक साठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली, १५ दिवसात निकाल जाहीर करण्याचे आश्वासन परीक्षार्थींना दिले होतं.
लोकसेवा मल्टिसर्व्हिसेस Lokseva Multiservices
विद्युत सहाय्यक च्या ५ हजार जागा १० वी आणि आयटीआय च्या गुणावर आधारित भरल्या जाणार आहेत हे सांगितले गेलं. त्यानंतर जुन २०२० पर्यंत परीक्षार्थींना कोणत्याही सुचना करण्यात आल्या नाहीत. २४/२५ जुन २०२० ला ऊर्जामंञी नितीन राऊत यांनी ७ हजार जागा त्वरित भरण्याचे सोशल मिडियावर जाहीर केलं आणि तसे परिपञक काढले. ऊर्जामंञ्यांच्या आदेशानुसार २८ जुन २०२० ला राञी ८ वाजुन १ मिनिटांनी ऊपकेंद्र सहाय्यकची पहिली निवड यादी आणि जवळपास १ हजार लोकांची प्रतिक्षा यादी जाहीर झाली. ज्यामध्ये परीक्षेचे गुण दर्शविण्यात आले नाहीत. २९ जुनला दुपारी त्या दोन्ही याद्या संकेतस्थळावरुन काढण्यात आल्या अन् ३० जुनला दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी सुधारीत यादी जाहीर झाली. दुसऱ्या वेळी जाहीर केलेल्या यादीत सुद्धा गुण जाहीर झालेले नाहीत. लवकरच वैयक्तिक गुणपञिका पाहण्याची संधी दिली जाईल असं सांगितले गेलं. त्यानुसार २ जुनला राञी गुण पाहण्याची लिंक ऊपलब्ध करुन देण्यात आली अन् काही तासातच ती लिंक हटवण्यात आली.
विद्युत सहाय्यकची गुणावर आधारित असणारी निवड यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, त्याविषयी कोणीही महावितरणच्या कर्मचारी किंवा अधिकारी आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांना भेटून विचारणा करु नये असे जाहीर निवेदन १ जुलै २०२० ला प्रसिद्ध करण्यात आलं. विद्युत सहाय्यकची निवड यादी १० वी च्या गुणावर जाहीर होणार की आयटीआय च्या गुणावर होणार याबाबत महावितरणने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. २०१३ साली झालेली विद्युत सहाय्यकची भरती १० वीच्या गुणावर करण्यात आली होती.
ऊर्जामंञ्यांनी आदेश देऊन १५ दिवस झालेत, अजुनही निवड यादी जाहीर करायला अवधी लागतोय, केंद्र शासनासह राज्य शासनाच्या अन्य विभागातील भरती प्रक्रियेत गुण जाहीर करण्यात येतात पण महावितरण विभागाने तसं न करता परीक्षार्थीना Shock देण्याचे काम केले आहे. सर्वांचे गुण एकञितपणे जाहीर व्हायला पाहिजेत अशी परीक्षार्थींची मागणी आहे. निवड यादी जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना आरक्षणातुन निवडलेल्या ऊमेदवारांना विविध दाखल्यांसाठी धावपळ करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडलेल्या ऊमेदवारांना महावितरणच्या स्थानिक परिमंडळ कार्यालयात आपापल्या कागदपञांची पुर्तता करावी लागणार आहे. राज्यात महावितरण मध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे, वादळ आणि पाऊस असल्याने अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. रखडलेली भरती प्रक्रिया वेगाने करुन लवकर कामावर रूजु करावे अशी मागणी होत आहे.



error: Content is protected !!