लाडशाखीय वाणी समाज बांधवांच्या संकल्पनेतून ‘एक मदतीचा हात गरिबांसाठी’
मनमाड : शहर देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असल्याने या स्थानकावर रोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असताना या प्रवाशांच्या येण्या-जाण्यासाठी सव्वाशे गाड्या या रेल्वे स्थानकावर रोज थांबत असल्याने या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ नेहमीच दिसून येते. पण मनमाड रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असल्याने याठिकाणी बेघर लोक परिस्थितीने अनेक मनोरुग्ण या रेल्वेस्थानकाच्या आश्रयाला वर्षानुवर्ष राहत असतात.
दिवसेंदिवस यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ दिसून येते. सध्या देशामध्ये कोरोणा व्हायरसने थैमान घातल्याने, जनता कर्फ्यू असेल किंवा राज्य सरकारने जाहीर केली संचारबंदी असेल यामुळे या लोकांच्या खाण्यापिण्याचा बाबतीत मोठी अडचण समोर येत आहे. अशा लोकांसाठी कोण काय करणार असा प्रश्न निर्माण झाल्याने मनमाड शहरातील काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्रित येऊन ह्या लोकांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सुरू केला. याचे महत्त्वाचे कारण काल जनता कर्फ्यू असताना ह्या लोकांना रेल्वेस्थानकापासून शहरांमध्ये हाकलण्यात आले आणि शहरातून आलेल्या लोकांनी कुठेतरी दुकानाच्या पाठीमागे पडक्या घरांमध्ये किंवा गावाच्या बाहेर जाऊन शेतामध्ये वास्तव्य करणे पसंत केले. त्या ठिकाणाहून सुद्धा त्यांना हाकलून देण्यात आले आणि शहरात कुठे काही खाण्यास मिळते की याच्यासाठी सैरावैरा फिरत असतानाच शहरातील लोक शहरांमध्ये काही खाण्यास मिळते का यासाठी सैरावैरा फिरत असताना चित्र दिसत होते.
याच अनुषंगाने मनमाड शहरातील काही लोकांनी एकत्र येऊन या लोकांना पोळी भाजी व इतर खाण्याची सामग्री घेऊन त्यांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील गोर गरीब व गरजू व्यक्तींना पोळी व चटणी चे पॅकेट मोफत वितरण करण्याचे ठरवले.
मनमाड शहर लाडशाखीय वाणी समाज बांधवांच्या संकल्पनेतून एक मदतीचा हात गरिबांसाठी सुरू करण्यात आला. यामध्ये अॅड. श्री अनीलजी कुंझरकर, निलेश पितृभक्त, योगेश अमृतकर, प्रदीप देव, रवींद्र ढासे, अतुल कोठावदे, राकेश पितृभक्त, जितू नेरकर, जितेंद्र वरखेडे, सतीश बधान आदींनी सहभाग घेतलाा होता.
जोपर्यंत संचारबंदी किंवा जीवनावश्यक वस्तू ऐवजी उपाहारगृहे छोटी-मोठी हॉटेल बंद राहतील तोपर्यंंत या या बेघर लोकांना रोजच्या रोज जेवण पाणी व इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी देण्यात येणार असल्याचे अॅड अनिल कुंझरकर यांनी पत्रकारांंशी बोलताना सांगितले.