लॉकडाउनच्या काळात संस्कार प्राथमिक शाळा राबवित आहे आधुनिक ऑनलाईन शिक्षण पद्धती

0 141

परळी,प्रतिनिधी –  संस्कार प्राथमिक शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आयोजित करत असते.

सध्या देशभरात कोविड 19 या रोगाचे संकट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था तात्पुरत्या बंद आहेत. या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संस्कार प्राथमिक शाळेने हीच बाब लक्षात घेऊन विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आधुनिक ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आधार घेतला आहे.

या पद्धतीमध्ये शाळेतील शिक्षकांनी वर्गनिहाय अध्यापन घटकानुसार विविध शैक्षणिक साहित्य वापरून स्वतः व्हिडीओ तयार करून ते व्हिडीओ विदयार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. यानंतर शिकविलेल्या घटकावर प्रश्नावली तयार करून ती प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात येत आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून शिक्षक सोडवीत आहे. या उपक्रमात विविध पीडीएफ फाईल प्रश्नावली विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात येत आहे.

शाळा नेहमीच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा एवढाच उद्देश या उपक्रमाचा आहे. या उपक्रमासाठी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपक तांदळे यांनी वेळोवेळी सूचना करून, त्यासाठी लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधांची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सोळंके कारखान्याने थकविले पैसे, कारवाई करण्याची साखर आयुक्तांकडे मागणी

 

error: Content is protected !!